बंडू निरगुडा यांच्या मृत्यू ची चौकशी करा – बिरसा क्रांती दल ठाणे जिल्हाची मागणी
मुरबाड / प्रतिनिधी – पांडुरंग गावंडा
मयत कु.बंडू रामा निरगुडा राहणार देवराळवाडी,पो.फणसोली,ता.
मुरबाड जि.ठाणे या आमच्या आदिवासी विद्यार्थ्याच्या घातपात व अपघाती संशयित मृत्यू झाल्यामुळे निवेदन बिरसा क्रांती दल ठाणे जिल्हाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी मुरबाड यांना देण्यात आले.
मयत कु.बंडू रामा निरगुडा हा विद्यार्थी आय.टी.आय.इलेक्ट्रिसिअन, तृतीय वर्षामध्ये कुडवली येथील आय.टी.आय.शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेत होता.सदर शिक्षण घेत असताना एकात्मिक आदिवासीं प्रकल्प शहापूर अंतर्गत शासकीय वसतिगृह मुरबाड या ठिकाणी,वास्तव्य करीत होता.सदर मयत मुलगा हा श्री.रामा भिवा निरगुडा मु.देवराळवाडी,पो.फणसोली,ता.मुरबाड,जि.ठाणे,या आमच्या गरीब आदिवासी इसमाचा मुलगा आहे.सदर आदिवासी मुलगा अभ्यासात तरबेज असताना,त्याच्या अपघाती मृत्यूने आमच्या आदिवासी बंधूच्या भावी स्वप्नांचा चक्काचुर झाला आहे.सदर मयत मुलगा याने एकात्मिक आदिवासीं विकास प्रकल्प शहापूर चे आदिवासी मुलांचे वसतिगृह मुरबाड या वसतीगृहाच्या पाठच्या बाजूस मोहाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने,लटकून गळफास घेतला आहे.परंतु सदर बाब ही संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते.
म्हणून पोलीस प्रशासनाने आमच्या आदिवासी मयत मुलाच्या मृत्यूचे खरे निःपक्षपातिपणे कारण शोधून,गुन्हेगारांचा तत्काळ तपास लावून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अन्यथा विविध आदिवासी संघटना व आदिवासी जनसमुदाय आंदोलन छेडेल.
त्यावेळी बिरसा क्रांती दल ठाणे जिल्हा अध्यक्ष चेतन बांगारे, उपाध्यक्ष पांडूरंग गावंडा, ठाणे जिल्हा महासचिव सतिष जाधव, कविता निरगुडे, रविंद्र आंबवणे, मधुकर पादीर, तुकाराम रडे, ललित वाघ आदी नागरीक उपस्थित होते.






