Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या प्रस्तावित जागेची उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी अडीअडचणी बाबत ग्रामस्थ व अधिकारी वर्ग यांची चर्चा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या प्रस्तावित जागेची उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी अडीअडचणी बाबत ग्रामस्थ व अधिकारी वर्ग यांची चर्चा

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील प्रस्तावित उपकेंद्राच्या जागेची पाहणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना उदय सामंत यांनी आज दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे विद्यापीठाच्या अधिकारी वर्ग व शिवनई ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पाहणी केली विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या कामात असणाऱ्या अडीअडचणी बाबत यावेळी चर्चा करण्यात आली काम तात्काळ सुरू करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याबाबत अधिकारी बरोबर ग्रामस्थांशी चर्चा केली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक येथील उपकेंद्र दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील 63 एकर जागेवर हे उपकेंद्र होणार असून शासनाने 2014 मध्ये जमीन हस्तांतरित केली होती विविध प्रशासकीय अडचणीमुळे हे काम प्रलंबित होते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले असून काम त्वरित होण्यासाठी सर्व प्रशासकीय मंजुरी दिली होती या कामाच्या प्रगतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत वेळोवेळी आढावा घेण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी आज शिवनई येथे जात प्रत्यक्ष जागेवर जाऊन उपकेंद्राच्या कामात येणाऱ्या अडचणी बाबत पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थित कामाचा आढावा घेण्यात आला यावेळी शिवनई ग्रामस्थांच्यावतीने सरपंच सुनीता निंबाळकर व पोलीस पाटील पांडुरंग गडकरी यांनी ग्रामस्थांच्यावतीने या उपकेंद्राच्या कामास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच स्थानिकांच्या समस्या बाबत माहिती दिली या उपकेंद्राला जाण्यासाठी दोन किलोमीटरच्या रस्त्याचे कामासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल या कामा साठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी वर्गाची बैठक घेण्यात येईल तसेच सर्व प्रलंबित कामांना तात्काळ मंजुरी देऊन पुणे विद्यापीठाच्या या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील ना सामंत यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे नांदगाव चे आ सुहास कांदे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रफुल्ल पवार उपकुलसचिव एम व्ही रासवे उपकेंद्राच्या कामाचे समन्वयक डॉ प्रशांत टोपे रणजित शितोळें दिंडोरीचे प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर तहसीलदार पंकज पवार मंडलाधिकारी राजेन्द्र विधाते तलाठी विजय कातकडे शिवनई सरपंच सुनिता निंबाळकर पोलीस पाटील पांडुरंग गडकरी ग्रामसेविका उज्वला भोईर आदींसह परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button