Faijpur

धनाजी नाना महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रम उत्साहात

धनाजी नाना महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रम उत्साहात

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

फैजपूर सलीम पिंजारी

धनाजी नाना महाविद्यालय मराठी विभाग व शिक्षण शास्त्र महिला महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी गझल निर्मिती प्रक्रिया व सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ.मनोहर सुरवाडे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गझलकार श्री. चंद्रकांत भुयार उर्फ बादशाह, शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया रावेर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विजय तायडे यांनी केले त्यात त्यांनी सदर कार्यक्रमात आयोजनामागील भूमिका स्पष्ट करून प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला प्रमुख मार्गदर्शक श्री भोयर यांनी गझल निर्मिती विषयी समीक्षणात्मक स्वरूपात माहिती देऊन स्वतःच्या लिखी लिहिलेल्या गझलांचे अतिशय बहारदार पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण केले व आपल्या बहारदार शैलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तसेच मराठी गझल कडे सध्याच्या भाषेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्वक वळणे आवश्यक आहे. याबरोबरच त्यांनी मराठीतील श्रेष्ठ गझलकार सुरेश भट, भीमराव पांचाळ यांच्या गझलांचा परिचय करून देऊन सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप डॉक्टर सुरवाडे यांनी करताना मराठी भाषा पंधरवडा निमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील भूमिका मांडून मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपल्याला जे जे करता येईल ते ते आपण करायला हवे याबद्दल विद्यार्थ्यांना पोटतिडकीने मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे काव्यवाचन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.शरद बिऱ्हाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर दीपक सूर्यवंशी यांनी केले. सदर कार्यक्रमाला मराठी पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button