Amalner

अमळनेर मतदारसंघात प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी केला मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

अमळनेर मतदारसंघात प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी केला मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

अमळनेर : निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 या अहर्ता दिनांकावर छायाचित्र सह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला असून यात 20 दिसेम्बर पर्यंत बी एल ओ घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आहे. मतदारांनी सहकार्य करून मतदार नोंदणी , छाया चित्र, नाव , जन्मदिनांक इ बाबत दुरुस्ती , नवीन व्होटर कार्ड आदी बाबत पूर्तता करून घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी सीमा आहिरे यांनी केले आहे.

मतदारांसाठी व्होटर हेल्पलाईन मोबाईल ऍप (voter verification app/ voter helpline)उपलब्ध केले असून google play store madhun ते डाउनलोड करता येत. मतदार स्वतः आपल्या मतदार यादीतील स्वतःच्या नावाची , पत्त्याची दुरुस्ती करू शकतील तसेच बी एल ओ मार्फत मतदारांच्या घरी जाऊन 2002 ते 2003 मध्ये जन्मलेल्या संभाव्य मतदारांचा तपशील गोळा करने , घरची नोंदणी करून त्याचे अक्षांश व रेखांश यांची नोंद घेने ही प्रक्रिया सुरू झाली आहे 1 जानेवारी 2020 रोजी पात्र असलेल्या मतदारांना नमुना अर्ज 6 वाटप करण्यात येणार आहे , कायमस्वरूपी स्थलांतर झालेले व मयत मतदारांची वगळणी करण्यात येणार असून मतदारांना सद्यस्थितीतील मतदान केंद्र सोयोचे आहे किंवा नाही याबाबत मतदाराचा अभिप्राय नोंदविण्यात येणार आहे सर्व कुटुंबाचे स्थलांतर एकाच मतदान क्षेत्रात करण्यात येईल बी एल ओ घरोघरी भेट देणार असल्याने मतदारांनाघरपोच सेवा मिळणार आहे त्यांच्याकडे शासनाचे ओळखपत्र असेल
मतदार यादीत पारदर्शकता आणून यादीतील गोंधळ दूर होऊन मतदारांना अधिक सुविधा मिळणार असून परदेशातील भारतीय नागरिकांचे देखील त्यांच्या कुटुंबाकडून तपशील गोळा करून मतदार यादीत नाव नोंदवले जाणार आहे नवीन ओळखपत्र दिले जाणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button