Kolhapur

पत्रकार पंकज गाडे यांना नॅशनल ऍवार्ड जाहिर

पत्रकार पंकज गाडे यांना नॅशनल ऍवार्ड जाहिर

सुभाष भोसले -कोल्हापूर
पलुस तालुक्यातील भिलवडी गावचे सुपुत्र, सी न्यूज वृत्त वाहिनी चे वार्ताहर पंकज गाडे यांना ओ.एच्.एच्.रेअर ब्लड ग्रुप असोशिएशन तासगांव यांच्यावतीने देण्यात येणारा नॅशनल ऍवार्ड जाहिर झाला आहे.तासगांव येथील समृद्धि मंगल कार्यालय तासगांव येथे ३० ऑक्टोबर रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे.

पत्रकार पंकज गाडे हे गेली सात ते आठ वर्षे पलुस तालुक्या बरोबर सांगली जिल्ह्यात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आहे.रक्तदान करने हा त्यांचा जणू आवडता छंद ,कोणत्याही ठिकाणी रक्तदान शिबिर आहे असे समजले तर ते आवर्जून त्या ठिकाणी जावून रक्तदान करतात.आपल्या रक्ताने कुणाचा तरी जीव वाचावा ही भावना नेहमी त्यांच्या मनात घर करून बसलेली असते.

सांगली जिल्ह्या बरोबर पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्या सी न्यूज चे ते पलुस-भिलवडी पत्रकार आहेत.आपल्या पत्रकारीच्या माध्यमातून समाजातील छोट्या मोठ्या विषयाच्या बातम्या करून ते विषय तडिस नेण्यास नेहमी प्रयत्न करत असतात. अंकलखोप येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची दुरुस्ती करण्यासाठी पत्रकार पंकज गाडे यांच्या बातम्या प्रभावी ठरल्या आहेत.अशा या कर्तव्यनिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यास नॅशनल ऍवार्ड मिळाल्या मुळे परीसरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी बोलताना पंकज गाडे म्हणाले की, या कामासाठी मित्र शशिकांत कांबळे आणि आई वडील मित्र परिवार आणि ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष महादेव चौधरी यांनी प्रेरणा दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button