Aurangabad

मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : माध्यमांवरील चर्चेदरम्यान मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका माध्यमावरील चर्चेत मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याशी संवाद साधत असताना सदावर्ते यांनी शुक्रवारी अपशब्द वापरला होता.
त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी ऍड. शिवाजी इंजे पाटील, रवींद्र जाधव, अमोल झळके, अरुण शेळके, संदीप जोगस आदींची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button