Mumbai

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी तील ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे कालवश; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी तील ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे कालवश; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी तील ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे कालवश; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: सरदार, मैने आपका नमक खाया है, हा  संवाद ज्यांनी गाजवला आणि मराठी नाटक चित्रपट सृष्टी आपल्या दमदार अभिनयाने सतत गाजवली अश्याच
हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी तील ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन झाले  वयाच्या ७८ व्या वर्षी गावदेवीतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे ३०० हून अधिक मराठी-हिंदी भूमिका त्यांनी साकारल्या. शोले, अंदाज अपना अपना, अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या.
गेल्या काही दिवसांपासून विजू खोटे यांची प्रकृती फारशी चांगली नाही. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानं एक हरहुन्नरी नट हरवल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होत आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या. 
याशिवाय अंदाज अपना अपनामध्ये त्यांनी साकारलेली रॉबर्ट ही व्यक्तीरेखादेखील अनेकांना आजही आठवते. अशी ही बनवाबनवी या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता. विजू खोटेंनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायक अतिशय उत्तमपणे वठवला. 

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button