Bollywood

?️बॉलिवूड Breaking..व्हायरल कट्टा..!करीना कपूर होतेय तिसऱ्यांदा आई..?सोशल मिडिया वर फोटो व्हायरल..!

?️बॉलिवूड Breaking..व्हायरल कट्टा..!करीना कपूर होतेय तिसऱ्यांदा आई..?सोशल मिडिया वर फोटो व्हायरल..!

मुंबई बॉलिवूड मध्ये सतत नवीन नवीन गोष्टी घडत असतात.अभिनेते अभिनेत्री ह्या विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात.आता तर सोशल मिडिया च्या माध्यमातून अनेक वेळा चित्र विचित्र फोटो,व्हिडीओ शेअर करून प्रसिद्धी मिळविण्याचा चांगलाच स्टंट बॉलिवूडकर करत असतात.ह्याच धर्तीवर अभिनेत्री करीना कपूर देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.सोशल मिडिया ऍक्टिव्ह असते. तैमूरसोबतचे फोटो तर कधी सारा अली खान सोबत चे फोटो तर मध्यंतरी इमरान खान ह्या अभिनेत्या सोबतचे फोटो शेअर करत जर सैफ बरोबर लग्न झाले नसते तर इमरान बरोबर लग्न केले असते असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर तिला भयंकर टीकेला सामोरे जावे लागले होते. २१ फेब्रुवारी रोजी करीना दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका मुलाला जन्म दिला. व त्याचे नाव येह असे ठेवले आहे..

आता करीनाने सोशल मीडियावर एक सोनोग्राफीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटोपाहून करीना पुन्हा प्रेग्नंट तर नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हातात सोनोग्राफीचा फोटो असलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘एका एक्सायटिंग गोष्टीवर काम करत आहे. पण तुम्ही विचार करताय ती ही गोष्ट नाही’ असे काप्शन आहे.करीनाने शेअर केलेला हा फोटो सध्या तुफान व्हायरल झाला आहे. या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत.

तर करीनाने सोनोग्राफीचा हा फोटो नेमका का शेअर केला आहे या मागचे कारण असे आहे की करीना कपूर तिच्या प्रेग्नन्सी चे अनुभव पुस्तक रुपात प्रकाशित करणार आहे. या पुस्तकात तिने आपल्या गरोदरपणाचा अनुभव लिहले असून पुस्तकालाच करिनाने तिसरे मूल म्हटले आणि नाव ‘बायबल’ दिले.

करीनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्वयंपाकघरात उभी असून आणि बेकिंग ट्रेमधून आपले पुस्तक बाहेर काढत आहे.व्हिडिओ शेअर करताना बेबो म्हणते ‘हा माझा प्रवास आहे. माझे गर्भधारणा आणि माझे गर्भधारणा पुस्तक बायबल. काही चांगले दिवस होते तर काही वाईट होते. काही दिवस मला कामावर जाण्याची घाई होती आणि काही दिवस अंथरुणावरुन बाहेर पडणेही कठीण होते. माझ्या दोन्ही गर्भधारणेदरम्यान मी माझ्या शारीरिक आणि भावनिक अनुभवांबद्दल लिहिले आहे म्हणून हे पुस्तक माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button