Nashik

थोरात विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न

थोरात विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न

सुनिल घुमरे नाशिक

मराठा विद्या प्रसारक समाजाचे,कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मोहाडी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य विजय म्हस्के होते.उच्च माध्यमिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास पाटील,प्रभाकर देशमुख, प्राचार्य विजय म्हस्के व पर्यवेक्षिका निर्मला शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विलास पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्राची माहिती दिली व त्यांनी घालून दिलेले आदर्श आपण आपल्या जीवनात आचरणात आणावीत असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विजय म्हस्के यांनी स्वातंत्र आंदोलनातील गांधीजींचे योगदान,स्वातंत्र मिळवण्यासाठी केलेला संघर्ष तसेच सत्य,अहिंसा व न्याय या तत्त्वांची माहिती दिली.लालबहादुर शास्त्री यांनी भारताचे पंतप्रधान असतांना केलेल्या कार्याविषयी माहिती दिली. विद्यालयाचे पर्यावरण प्रेमी,स्वच्छतादुत प्रमोद सोनवणे यांनी सर्वांना “स्वच्छतेची शपथ” दिली.कार्यक्रमाचा समारोप “रघुपती राघव राजाराम पतीत पावन सिताराम”या भजनाने व”जय जवान जय किसान”या घोषणेने झाला.आजच्या कार्यक्रमास सामाजिक अंतर ठेवून विद्यालयातील सेवक बंधु व भगिनीं उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले.आभार प्रदर्शन तुषार गिते यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button