Nandurbar

नवापूर चालत्या रेल्वेतून युवकाला ढकलल्याने युवकाचा जागीच मृत्यू

नवापूर चालत्या रेल्वेतून युवकाला ढकलल्याने युवकाचा जागीच मृत्यू

नंदुरबार फहिम शेख

नंदुरबार उधना मेमो पॅसेंजर रेल्वे सोमवार दुपारी १२:५० वाजेच्या सुमारास नंदुरबार ते सुरत रेल्वे रुळावर प्रवासादरम्यान एका महिलेची छेड काढत असलेल्या व्यक्तिस महिलेसोबत असलेल्या दोघांनी समजविण्याचा राग आल्याने त्याने चिंचपाडा गावाच्या अलीकडे फरहाज कुरेशी हा त्यांचा मित्राच्या मावशी सोबत बोलत असतांना सदरील व्यक्ती संदिप वळवी याने मागुन कमरेवर लाथ मारुन रेल्वेचा बाहेर फेकले व त्या सोबत असलेला अब्रार शेख यास जिवेठार मारण्याचे उद्देशाने कॉलर पकडुन रेल्वे खाली फेकण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी इतर प्रवासींनी सदरील व्यक्तीस पकडले. दरम्यान फरहाज कुरेशी हा युवक केलपाडा शिवारातील रेल्वे पुलाखाली उंचावरून पडल्याने गुप्त अंगास व उजव्या पायाचा पोटरीजवळ गंभीर दुखापती होवून त्यात फरहाज हाजी मोबीन कुरेशी , वय 17 वर्ष, रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार याचा जागीच मृत्यू झाला.
मयत युवकाचे विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करण्यात आले.
रेल्वे अपघातात मृत युवकाची माहिती मिळतात विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात नवापूर व नंदुरबार येथिल नातेवाईव नागरिकांनी गर्दी करत एकच आक्रोश केला.

सदर घटनेबाबत अब्रार कुरेशी शेख अस्लम वय 17 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात संदिप गणेश वळवी, रा केलपाडा ता नवापुर याच्या विरुद्ध भादंवि कलम ३०२, ३०७,३५४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button