Dharangaw

जनसुराज्य संस्थेचे शिष्टमंडळ नामदार गुलाबराव पाटील यांच्या भेटीला

जनसुराज्य संस्थेचे शिष्टमंडळ नामदार गुलाबराव पाटील यांच्या भेटीला

किरण चव्हाण

धरणगाव दि-19

जनसुराज्य ग्रामविकास मंडळ खेडी खुर्द व सिम(प्र ज)येथील पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेतली.

जनसुराज्य संस्थेचे शिष्टमंडळ नामदार गुलाबराव पाटील यांच्या भेटीलामहाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री व जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल ना.गुलाबराव पाटील यांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

या प्रसंगी विविध विषयांवर चर्चा करून खेडी गावाचा शास्वत विकास या मुद्यावर भर देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.एकंदरीत सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून नामदार पाटील यांनी पदाधिकारी यांना आश्वस्थ केल की,
गावाच्या शास्वत विकासासाठी मी सदैव तत्पर असून, आपली केव्हाही कोणत्याही प्रकारची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन ना.पाटील यांनी यावेळी दिले.

जनसुराज्य संस्थेचे शिष्टमंडळ नामदार गुलाबराव पाटील यांच्या भेटीला

या शिष्टमंडळात जनसुराज्य ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानदेव पाटील, कार्याध्यक्ष-पद्माकार पाटील, सभासद-किरणं चव्हाण, यशवंत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते
या भेटीबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button