Latur

लिंगायत आरक्षणासाठी लिंगायत महासंघाचे औसा तहसीलदार यांना निवेदन सादर

लिंगायत आरक्षणासाठी लिंगायत महासंघाचे औसा तहसीलदार यांना निवेदन सादर

लातूर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

लिंगायत महासंघ औसा तालुकाच्या वतीने दि.८ ऑक्टोबर रोजी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली सरसकट लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकार्‍यांना व औसा येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला लिंगायत, हिंदु लिंगायत, वाणी, वीरशैव या नावाने बोलले जाते व तशीच आमच्या कागदपत्रावर नोंदीही आहेत. वाणी व लिंगायत वाणी नावाला ओबीसीचे आरक्षण आहे. वाणी, लिंगायत वाणी असा जोडशब्द केल्यामुळे लिंगायतांना आरक्षण मिळत नाही. त्यापेक्षा लिंगायत, वाणी एवढीशी दुरूस्ती केली किंवा लिंगायत, हिंदु लिंगायत, वीरशैव वाणी या एकाच जातीची नावे आहेत असे समजून नवे शुध्दीपत्रक काढल्यास त्याच्या लाभ महाराष्ट्रातील लाखो लिंगायतांना होईल.
ज्यांच्या कागदपत्रावर लिंगायत, हिंदु लिंगायत व वीरशैव आहे यांना वाणी नावाला लागू असलेले आरक्षण मिळत नाही. तसेच या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी महसुली, जुने पुरावेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे कागदी मेळ, शब्द खेळाच्या जाळ्यात लिंगायत आरक्षण आडकले आहे. आज लिंगायत महासंघाच्यावतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना वरिल मागणीचे निवेदन देण्यात आले व हा प्रश्‍न लवकरात लवकर सुटावा अशी विनंती करण्यात आली.
हे निवेदन देतांना लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी भातमोडे, औसा तालुका युवा अध्यक्ष गणेश बिराजदार,लामजना शाखा अध्यक्ष बालाजी बिराजदार, ज्ञानेश्वर चिल्ले,सोमनाथ वागदरे, महेश बोमणे, सतिश चिल्ले, वैजिनाथ डिगुळे, गुंडाप्पा बिराजदार, रमेश कलशेट्टी यांच्यासह आदिंची यावेळी उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button