Nashik

राष्ट्र विकासासाठी प्रथम गावाचा विकास होणे गरजेचे :खा डॉ भारती पवार.

राष्ट्र विकासासाठी प्रथम गावाचा विकास होणे गरजेचे :खा डॉ भारती पवार.

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : पेठ तालुक्यातील तांदूळ बारी येथे पंचक्रोशीतील समस्यांबाबत व तेथील नागरिकांच्या भेटीसाठी खा डॉ भारती पवार उपस्थित होत्या .पेठ तालुक्यातील शेवटच्या टोक असणारे घनशेत, तांदूळ बारी, करंजळी परिसरातील अनेक गावचे सरपंच ,चेअरमन परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली ह्या बैठकीत पाणी ,आरोग्य ,शिक्षण,रस्त्यांच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी तसेच अनेक शासकीय योजनांचा आढावा या बैठकित खा डॉ भारती पवार यांनी घेतला व त्यांचा शासकीय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.” राष्ट्राच्या विकासासाठी प्रथम गावाचा विकास होणे गरजेचे असून ह्याकामी आत्मनिर्भर युवकांचे योगदान महत्वाचे आहे .”आदिवासी भागातील मुलामुलींची शिक्षणाची परिस्थिती अजूनही बिकट असून ती सुधारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खा डॉ भारती पवार यांनी ह्या बैठकी प्रसंगी केले .तसेच पेठ येथील झाडीचा पाडा , केंग पाडा,शिराळकुंड, जढे -शिराळे येथील पाण्याच्या रस्त्यांच्या विजेच्या संदर्भातील अडचणी समजावून घेत तेथील नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या समजावून घेतल्या . पेठ शहराच्या अनेक समस्यांसंदर्भात चर्चा करत त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे खा डॉ भारती पवार यांनी सांगितले या प्रसंगी रघुनाथ चौधरी ,डॉ प्रशांत भदाणे, दिलीप पाटील चिंतामण महाले ,अशोक जाधव ,त्रंबक कामडी, रमेश गालट, प्रमोद शार्दूल, हेमंत कोरे, विजय देशमुख छगन चारोस्कर सदाशिव चौधरी, अंकुश चौधरी ,चंदू पठाडे, साहेब, हरिसेठ नगरकर, कैलास चौधरी,महादू पाडवी, पुंडलिक कडाली ,धर्मराज भादंगे ,गोपाळ चौधरी, प्रभाकर भादंगे, सुरेश भादंगे ,आनंदा पागी,यांचेसह अनेक नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button