Amalner

Amalner: महापरिनिर्वाण दिनी डि. आर. कन्या शाळेत विद्यार्थिनींनी व्यक्तिचित्र काढून वाहिली अनोखी आदरांजली..

Amalner: महापरिनिर्वाण दिनी डि. आर. कन्या शाळेत विद्यार्थिनींनी व्यक्तिचित्र काढून वाहिली अनोखी आदरांजली..

अमळनेर आज 6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रीमती.डि.आर. कन्या शाळेतील विद्यार्थीनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र काढून आदरांजली वाहिली.

कन्या शाळेतील कला शिक्षक डि. एन. पालवे यांनी इयत्ता आठविच्या विद्यार्थिनींना पंधरा दिवस व्यक्तिचित्र काढणे शिकविले. यासाठी शाळेचे शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल यांनी प्रेरणा दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, पर्यवेक्षक श्रीमती एस. पी. बाविस्कर, एस. एस. माळी यांनी मार्गदर्शन केले.

शाळेतील सकाळ व दुपार दोन्ही सत्राच्या सुमारे 200 विद्यार्थिनींनी चित्रकलेत भाग घेतला.तसेच यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर, कार्यावर आधारित भाषणे देखील विद्यार्थिनींनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button