Amalner: अर्बन बँकेच्या चेअरनपदी मोहन सातपुते आणि व्हा चेअमनपदी प्रदीप अग्रवाल यांची नियुक्ती…
अमळनेर येथील अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीनंतर चेअरमनपदी
मोहन बाळाजी सातपुते तर व्हा चेअरमनपदी प्रदीप कुंदनलाल अग्रवाल यांची बिनविरोध निवड दि 19 रोजी संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली.
सुरवातीला निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एन. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची निवड सभा पार पडली. यावेळी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोंघांची बिनविरोध जाहीर करण्यात आली. निवडीनंतर हितचिंतकानी बाहेर जल्लोष साजरा केला. सभेला विद्यमान संचालक प्रविण जैन, पंडित चौधरी, दीपक साळी, पंकज मुंदडा, प्रदीप अग्रवाल, भरत ललवाणी, अभिषेक पाटील, लक्ष्मण महाजन, सौ वसुंधरा लांडगे,डॉ मनीषा लाठी, रणजित शिंदे उपस्थित होते. यावेळी सहा निवडणूक अधिकारी सुनिल
महाजन, बँकेचे मॅनेजर अमृत पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी कुंदनलाल अग्रवाल, बजरंग अग्रवाल, खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, संचालक विनोदभैय्या पाटील, योगेश मुंदडा, हरी भिका वाणी, डॉ संदेश गुजराथी, अध्यक्ष जितेंद्र झाबक, माजी कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, प्रविण साहेबराव पाटील,सौ माधुरी पाटील, बन्सीलाल भागवत, अँड विवेक लाठी, गिरीश जैन, महेश
पवार, योगेश मुंदडा, नितीन निळे, प्रताप साळी, सुरेश अर्जुन पाटील, दशरथ लांडगे, मनीष जोशी, मुन्ना शर्मा, गणेश गुप्ता, हर्षल पाटील, प्राचार्य महाजन, नाईक, प्रल्हाद पाटील, प्रसाद शर्मा,ईश्वर सैनानी,विजय शेखनाथ पाटील यासह बँकेचे असंख्य सभासद व मान्यवर उपस्थित होते.






