आज मेघवाडी पोलीस ठाणे हद्दीत रोड मार्च आयोजित करण्यात आला होता.
सदर रोड मार्च मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज कुमार शर्मा, पश्चिम प्रादेशिक विभाग यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली करण्यात आला.
प्रतिनिधी पी व्ही आनंद
सदर रोड मार्च साठी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री मनोज कुमार शर्मा, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ दहा श्री विशाल ठाकूर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग श्री दिनेश देसाई, प्रभारी वपोनी श्रीमती शुभदा चव्हाण मेघवाडी पोलीस ठाणे, प्रभारी वपोनी राऊत जोगेश्वरी पोलीस ठाणे, प्रभारी वपोनी देशमुख अंधेरी पोलीस ठाणे, मेघवाडी पोलीस ठाण्याचे व जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार, मेघवाडी स्ट्रायकिंग, सुपर स्ट्रायकिंग, मेघवाडी कॉम्ब्याट व मेघवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार सहभागी झाले होते.
सदर रोड मार्च दरम्यान पी ए सिस्टम वरून लोकांमध्ये covid 19 या साथीच्या रोगाबाबत जनजागृती करण्यात आली.
सदर रोड मार्च इन्कम टॅक्स कॉलनी, हेमा इंडस्ट्रीज, सर्वोदय नगर, कोकण नगर, न्यू शामनगर, जेवी एल आर, समर्थ नगर, आनंद नगर, मजास गाव, महाराज भवन ते गांधीनगर या मार्गावर 17.15 ते 18.00 या वेळात करण्यात आला.






