Maharashtra

कापूस खरेदी सकाळी लवकर सुरू करा-डॉ.राजेंद्र भारुड

कापूस खरेदी सकाळी लवकर सुरू करा-डॉ.राजेंद्र भारुड

प्रतिनिधी फहिम शेख

नंदुरबार दि.27 : अधिकाधीक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करता यावा यासाठी सकाळी लवकर कापूस खरेदी सुरू करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.

नंदुरबार येथील गजानन जिनींग मिलला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन कापूस खरेदीची माहिती घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तृप्ती धोडमिसे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, सीसीआयचे अधिकारी आदी उपस्थित होते.

पावसाळा सुरू होणार असल्याने कापूस खरेदी लवकर पुर्ण करावी. खरेदीच्या ठिकाणी नगर पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचे सहकार्य घेण्यात यावे. दिवसभरात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचे नियेाजन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

0000

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button