फैजपूर

धनाजी नाना महाविद्यालयामध्ये भारत्तोलन, शक्तित्तोलन ,बुद्धीबळ (महिला/ पुरुष) व शरीरसौष्टव (पुरुष) स्पर्धा संपन्न

धनाजी नाना महाविद्यालयामध्ये भारत्तोलन, शक्तित्तोलन ,बुद्धीबळ (महिला/ पुरुष) व शरीरसौष्टव (पुरुष) स्पर्धा संपन्न

फैजपूर- सलीम पिंजारी

धनाजी नाना महाविद्यालय येथे झालेल्या क.ब.चौ. उ.म.वि.जळगाव अंतर्गत आंतर विभागीय भारत्तोलन,शक्तित्तोलन (महिला/पुरुष) व शरीरसौष्टव (पुरुष) या खेळ प्रकारात विद्यापीठाआंतर्गत जळगाव, धुळे, नंदुरबार आणि एरंडोल अश्या चारही विभागातील पुरुष आणि महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. या क्रीडा प्रकारामध्ये एकुण महिला 34 व 128 पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. अनिल भंगाळे व उद्घाटक म्हणुन वरीष्ठ क्रीडा संचालक डॉ.बी.एल.पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉ.दिनेश पाटील क्रीडा संचालक क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव, प्रा.सतिष कोगटा, प्रा.संजय चौधरी, प्रा.पी.आर.चौधरी सचिव जळगाव विभाग, प्रा.तेजस शर्मा सचिव धुळे विभाग, प्रा.लिंबाजी प्रताळे, प्रा.हर्शदा पाटील, प्रा.डॉ.चॉंद खॉ, प्रा.सचिन पाटील, प्रा.डॉ.शैलेश पाटील, प्रा.उमेश पाटील तसेच निवड समिती सदस्य प्रा.दिनेश तांदळे, प्रा.मुकेश पवार, प्रा.महेश पाटील, प्रा.प्रमोद पटेल, प्रा.डॉ. सतिष चौधरी जिमखाना समिती चेअरमन इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी डॉ. बी.एल.पाटील यांनी विद्यापीठाने या खेळामध्ये आतापर्यंत केलेल्या प्रगतीचा इतिहास वाचला तसेच खेळातील प्रगतीसाठी सराव अत्यंत महत्वाचा आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ए.आय.भंगाळे यांनी मनुष्य जीवनात प्रत्येक व्यक्ती दैनंदिन कार्य करतांना कसल्या ना कसल्या प्रकारचे साहित्य किंवा वजन उचलत असतो त्यामुळे एक प्रकारे व्यक्ति रोज भारत्तोलन खेळाचा सराव करत असतो आज या स्पर्धेचे उद्घाटन करत असतांना भारत्तोलन आणि बुद्धीबळ या दोन्ही खेळाचे उद्घाटन म्हणजे शक्ती आणि बुद्धी यांचा संयोग होय.

भारत्तोलन या खेळात वजन उचलतांना ताकदी सोबत युक्ती महत्वाची आहे तर बुद्धीबळ या खेळात युक्तीसोबत ताकद महत्वाची आहे असे सांगितले आणि सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.डॉ.जी.एस.मारतळे यांनी केले. प्रस्ताविक डॉ. सतिष चौधरी यांनी केले तर आभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले.

वरील स्पर्धेत भारत्तोलन, शक्तित्तोलन व शरीरसौष्टव (पुरुष) या तिनही प्रकारात जळगाव विभाग विजयी, भारत्तोलन व शक्तित्तोलन (महिला) क्रीडा प्रकारात जळगाव विभाग विजयी, धुळे विभाग शक्तित्तोलन व शरीरसौष्टव (पुरुष) प्रकारात आणि भारत्तोलन महिला प्रकारात तिस-या स्थानी राहिले, एरंडोल विभाग शक्तीत्तोलन व शरीरसौष्टव (पुरुष) व भारत्तोलन महिला प्रकारात द्वितीय स्थानी राहिले व भारत्तोलन पुरुष प्रकारात तिसरा क्रमांक प्राप्त केला. नंदुरबार विभागाने भारत्तोलन (पुरुष) या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

बुद्धीबळ या क्रीडा प्रकारात जळगाव विभाग पुरुष प्रकारात विजयी तर महिला प्रकारात उपविजयी राहिले. धुळे विभाग महिला प्रकारात विजयी तर पुरुष प्रकारात उपविजयी राहिले. एरंडोल विभाग पुरुषांमध्ये आणि नंदुरबार विभाग महिलांमध्ये तृतीय स्थानी राहिले.
या स्पर्धेच्या पारितोषक वितरण प्रसंगी जिमखाना समितीचे चेअरमन प्रा.डॉ.सतिष चौधरी अध्यक्ष स्थानी होते व प्रमुख पाव्हुणे डॉ.दिनेश पाटील म्हणुन उपस्थित होते.

या प्रसंगी शरीरसौष्टव स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ शरीर सौष्ठव पटूचा क.ब.चौ.उ.म.वि.श्री चा बहूमान यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.डॉ.जी.ए.मारतळे यांनी केले तर पंच म्हणुन प्रा.मुकेश पवार, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा.उमेश पाटील यांनी कार्य केले. तसेच तांत्रिक समितीचे सदस्य म्हणुन डॉ.संजय चौधरी, डॉ.पी.आर.चौधरी यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. युवराज गाढे, श्री. आर.डी.ठाकुर, श्री.प्रकाश भिरुड, श्री.कन्हैया फेगडे, श्री. पंकज मोरे, श्री.तुषार सपकाळे, अल्लाउद्दीन तडवी, धम्मदिप मेघे, योगेश महाजन, अतुल महाजन आदिंनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button