Maharashtra

कोरोनामुक्त मोठा वाघोदयात पुन्हा प्रवेश करु शकतो कोरोना गाव कोरोना संकटाचे

कोरोनामुक्त मोठा वाघोदयात पुन्हा प्रवेश करु शकतो कोरोना गाव कोरोना संकटाचे सावटाखाली शेजारील गावांत कोरोनाचा थैमान
गांव कोरोनामुक्त झाले मात्र शुन्य उपाय योजनामुळे सोशल डिस्टंन्सीग चां फज्जा उडालेला आहे कोरोना बचाव समिती अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंचांची ग्रामपंचायतीस दांडी कायमच

प्रतिनिधी मुबारक तडवी

महिनाभरापूर्वी जगात हाहाकार माजविलेल्या कोरोना महासंकटाने मोठा वाघोदा गावातही प्रादुर्भाव वाढून दोन मयतांसह १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते अचानक इतके बाधित रुग्ण आढळल्यामुळे गावात खळबळ उडाली होती त्यात महाशय लोकनियुक्त सरपंच तथा अध्यक्ष कोरोना बचाव समिती यांनी ग्रामपंचायतीकडे फिरविलेली पाठ व केलेलं दुर्लक्षामुळे व अनुपस्थितीमुळे गावकर्यांत भितीचे वातावरण पसरले होते याचं अनुषंगाने इंन्सिडंट कमांडंट फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे, रावेर तालुका आरोग्य अधिकारी शिवराय पाटील,सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल वाघ,पिएसआय राजेंद्र पवार, ग्रामसेवक नितीन महाजन,तलाठी वानखेडे पोलिस पाटील जगदीश देवराव पाटील,उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी, सदस्य कालु मिस्तरी, नितीन सुपे, संजय माळी, मुबारक तडवी,उदय पाटील,भूषण चौधरी, विशाल पाटील,हर्षलपाटील,आनंद भालेराव,स्वप्निल पवार आदिंसह सर्व सन्माननीय महिला सदस्यां, भालेराव,स्वप्निल पवार प्राथमिक आरोग्य केंद्र चे डॉ.राणे, सर्व अंगणवाडी सेविका मदतनिस आशासेविका आदिंनी अथक परिश्रमाने मोठा वाघोद्यात विविध उपाय योजना केल्या व कोरोनामुक्त झाले आहे मात्र गांव कोरोनामुक्त झाले आहे रुग्ण मुक्त झाले आहे पण कोरोना संकट टळलेल नाही सध्या गावात सर्वत्र *ऑल इज वेल*असल्याचे चित्र दिसत आहे सर्वत्र काही एक झालं नव्हतं व काहीही होणार नाही या गाफिलीत नागरिक वावरतांना दिसत आहेत मोठा वाघोदा शेजारच्या सावदा,चिनावल,विवरा, या गावांत कोरोनाने थैमान घातलेले असताना निश्चींत महाशय लोकनियुक्त सरपंच तथा कोरोना बचाव समिती अध्यक्ष यांची ग्रामपंचायतीस सतत गैरहजेरी उपाय योजना, दैनंदिन कारभारासह विकासात्मक कामांना बसलेली खिळ व नियुक्त ग्रामविकास अधिकारी यांनी आणखी वाढविलेली दुसर्या महिण्याची सुट्टी तर ग्रामसेवक प्रभारी लयभारी एक दोन दिवसाआड देताहेत ग्रामपंचायतीत हजेरी तसेच पोलिस पाटील यांनी ही रजा घेतल्याने दसनुर पोलिस पाटील यांचेकडे पदभार देण्यात आलेला आहे.अशा परिस्थितीत सोशल डिटंन्सिन, विनाकारण घराबाहेर पडणे, तोंडावर मास्क न लावणे , भाजीपाला विक्रेते,दुध डेअरी,किराणा दुकाने,चिकन मटन मासे विक्रीची ठिकाणे या ठिकाणांवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होत सोशल डिटंन्सिन चां फज्जा उडलेला दिसत आहे तरी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत,वरिष्ठांनी तात्काळ दखल न घेतल्यास कोरोनामुक्त मोठा वाघोद्यात पुन्हा प्रवेश करुन थैमान घालू शकते कोरोना ? तरी मोठा वाघोदा गावात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा होऊ नये यासाठी संबंधितांनी तात्काळ दखल घेऊन उपाय योजना करावी अशी मागणी गावकर्यांतून होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button