Amalner: क्षत्रिय काच माळी समाजाची सदभाव बैठक संपन्न…
अमळनेर (प्रतिनिधी) क्षत्रिय काच माळी समाज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित सामाजिक सदभाव बैठक माळी समाज मढी,अमळनेर येथे संपन्न झाली. या बैठकीत कौटूंबिक व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी ७२ जाती,धर्माचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीचे प्रमुख वक्ते रा. स्व. संघ प्रांत सदभाव, प्रमुख सुधाकरजी कुळकर्णी (लातूर) यांनी यावेळी अनमोल मार्गदर्शन केले. व्यासपीठावर, डॉ. चद्रकांतजी पाटील (मा.संघचालक, अमळनेर) आणि अमळनेर माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन हे उपस्थित होते. या सामाजिक सदभाव बैठकीत क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.






