ही जातीय वादी विकृती संपणार कधी….!!!!
भिम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष मा.उत्तरेश्वरजी कांबळे यांची थेट हॉस्पिटलमध्ये धडक.
जळीत आदिवासी मुलीवर निःशुल्क इलाज.
लक्ष्मण कांबळे
ह्या पुरोगामी महाराष्ट्रातील जातीयवाद्यांचा नंगानाच थांबायचं नाव घेत नाही , बुरसटलेल्या विकृत विचारसरणीचे हैवान रोज इथल्या मातीला कलंकित करीत आहे , शरमेने मान खाली घालायला लावत आहे. असाच अघोरी आणि माणुसकीला काळिमा फासणारा नीच प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथे घडला. ह्याच गावात आमच्या आदिवासी समाजातील महिलेवर सहा महिन्यापूर्वी काही वासनांध नराधमांनी अत्याचार केला होता.
“ती केस काढून घे” म्हणून जातीयवादी गावगुंडानी त्या पिडीत महिलेच्या अवघ्या १० वर्षाच्या कोवळ्या मुलीवर पेट्रोल टाकून जाळले होते. त्यात ती मुलगी सुमारे १२ % भाजली होती. ह्याची खबर लागताच भिम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष मा.उत्तरेश्वरजी कांबळे यांनी तडक ही जळीत मुलगी ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती त्या ‘सुपा’ ह्या गावातील डॉ.जगताप साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपुस केली.* ह्या मुलीची आर्थिक परिस्थिती पहाता भिम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष मा.उत्तरेश्वरजी कांबळे यांनी सामाजिक न्याय खात्याचे मा.वाबळे साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे संभाषण करून त्या पीडित आणि जळीत मुलीला तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची विनंतीवजा सूचना केली. तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्यासह स्वतः उत्तरेश्वर कांबळे यांनी डॉ.जगताप साहेबांशी संवाद साधला असता डॉ.जगताप साहेबांनी मानवधर्माला स्मरून ह्या मुलीवर निःशुल्क उपचार केले,ह्याबद्दल मा.उत्तरेश्वर कांबळे यांनी डॉ.जगतापांचे जाहीर आभार मानले. आज ह्या मुलीला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती उत्तरेश्वर कांबळे यांनी दिली आहे.
या प्रकरणी एका नराधम आरोपीला अटक करण्यात आली असुन , एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले साहेब यांनी सांगितले आहे.






