Amalner

शेतकऱ्यांचा मका व कापुस खरेदी करावी अन्यथा प्रतिक्विंटल अनुदान द्यावे-पराग पाटील.

शेतकर्यांचा मका व कापुस खरेदी करावी अन्यथा प्रतिक्विंटल अनुदान द्यावे-पराग पाटील.

तहसीलदारांना निवेदन देऊन केली मागणी.

प्रतिनिधी नूरखान

अमळनेर-महाराष्ट्र शासनाने राज्य मार्केटिंग फेडरेशन मार्फत मका व महाराष्ट्र राज्य कापूस फेडरेशन मार्फत कापूस खरेदी सुरु केली होती.शासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत तालुक्यातील शेतकर्यांनी कापूस व मका विक्री करण्यासाठी रीतसर नोंदनी केलेली होती.परंतु नोंदनी केल्यानंतर फक्त काही दिवस खरेदी सुरु ठेवली व अनेक दिवसापासून खरेदी बंद करण्यात आलेली आहे.म्हणुन आजही बहुतांश शेतकर्यांचा माल घरात पडुन आहे व शेतकरी हवालदील झालेला आहे.खाजगी व्यापारी मालाला भाव देत नाही व शासन खरेदी चालु करीत नाही व त्यावर ह्या कोरोणाच्या संकटामधे सर्वसामान्य जनता तसेच शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

यासाठी राज्य शासन जर शेतकर्यांचा माल खरेदी करण्यास सक्षम नसेल तर त्यांनी शेतकर्यांना प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे व त्याचप्रमाणे लवकरात लवकर ज्यांची खरेदी केलेली आहे त्यांना पैशांचे वितरण व्हावे अन्यथा शेतकरी आत्महत्या वाढतील.म्हणुन हि भयावह परीस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी लवकरात लवकर सकारात्मक उपाययोजना राबवाव्यात अन्यथा शेतकर्यांच्या वतीन लाॅकडाऊन काळातही तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक तथा बाम्हणे विकास सोसायटी चे चेअरमन पराग शाम पाटील यांनी दिले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,मा उपाध्यक्ष दिनेश माळी (भिलाली),रामलाल पाटील(जुनोने) आदि यावेळी उपस्थित होते.

सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील,कृषीमंत्री दादा भुसे,पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार अनिल पाटील,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे यांना ईमेलद्वारे व पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button