Pandharpur

प्रशासनास सहकार्य केल्यास लवकरच या संकटातून आपण बाहेर पडु विवेक परदेशी आरोग्य समिती सभापती

प्रशासनास सहकार्य केल्यास लवकरच या संकटातून आपण बाहेर पडु
विवेक परदेशी आरोग्य समिती सभापती

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरांमध्ये प्रदक्षणा मार्ग येथे आज कंटेनमेंट झोन मध्ये आरोग्य विभागा मार्फत तपासणीला सुरवात केली आहे.नागरिकांची थर्मल स्किनिंग व्दारे तपासणी करण्यात आली आहे. पल्सऑक्सिमीटर च्या सहाय्याने तपासणी करणार आहोत. तसे आपण सोडियम हायपोक्लोराइड ची टँकर व्दारे फवारणी करत आहोत. ज्या भागात टँकर जाउ शकत नाही त्या भागाची हँड पंप मशीन च्या सहाय्याने फवारणी करत आहोत, सदर भाग निर्जन्तुक करण्यात आला आहे असे श्री परदेशी यांनी सांगितले.

आरोग्य विभागा कडुन तातडीने यंत्रणा राबवली गेली.नागरिकांनी घाबरू जाउ नका, आपल्या भागामध्ये कोणी आजारी असेल्यास त्वरित प्रशासनाला माहिती द्या, त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देणे महत्त्वाचे आहे. रुग्ण सेवा हिच खरी ईश्वर सेवा असल्याचे श्री. परदेशी यांनी सांगितले. प्रशासनाला माहिती द्या सहकार्य करा, कोणताही संकोच मनात बाळगु नका, प्रशासन आपणास मदत करेल. आपले सर्व प्रश्न सोडवले जातील असे सांगितले. ज्या ज्या वेळी नागरिकांनी सहकार्य केले त्या त्या वेळी आपणास यश मिळाले. या कठीण प्रसंगी आरोग्य विभागाला, प्रशासनाला योग्य माहिती देउन मदत करण्याचे अवाहन श्री परदेशी यांनी केले. लवकरच आपण या संकटातुन बाहेर पडु असे सांगितले.तसेच या दरम्यान बाहेर गावाहुन नवीन व्यक्ती आपल्या भागात आल्यास त्याची ही माहीती त्वरित प्रशासनाला द्या. ती व्यक्ती , नागरिक शासनाचे आदेश पाळुन आली का हे तपासणे गरजेचे आहे तसेच उपजिल्हारुग्णालयात तपासणी करुन आले आहेत का हे ही तपासणे गरजेचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, घाबरुन जाता कामा नये, शासनाचे आदेश पाळणे महत्त्वाचे आहे, फिजीकल डिस्टंस ठेवणे, मास्क वापरणे , वरचेवर हात धुणे खुप गरजेचे असल्याचे सांगितले. वॉश बेसीन असल्यास सँनिटायझर चा वापर टाळावा असे सांगितले. कोरोना पार्श्वभूमीवर सर्वांच्या घरी सँनिटायझर आहे. लहान मुलांपासून सँनिटायझर लांब ठेवण्यास सांगितले. लहान मुलांना सँनिटायझर पासुन धोका झाल्याचे बातम्या वाचण्यात येत असल्याचे सांगितले. निश्चितच या संकटावर आपण मात करु असा मला विश्वास असल्याचे सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button