सांगली

भिडेंच्या डोक्यात पडले किडे… चर्चेत राहण्यासाठी वक्तव्य करतात..पुन्हा एकदा सुटला तोल

भिडेंच्या डोक्यात पडले किडे…
चर्चेत राहण्यासाठी वक्तव्य करतात.. 
पुन्हा बोलताना सुटला तोल

भिडेंच्या डोक्यात पडले किडे... चर्चेत राहण्यासाठी वक्तव्य करतात..पुन्हा एकदा सुटला तोल

सांगली 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पंतप्रधान मोदी यांनी जगाला गौतम बुद्ध दिले.त्यांचे विचार आणि तत्वज्ञान दिले.असे आपल्या भाषणात स्पष्ट केले. नेहमी प्रमाणे शिवप्रतिष्ठान चे संस्थापक यांना बेताल वक्तव्य करून चर्चेत राहण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या वाणीतून तिर सोडत भारताने जगाला बुद्ध दिला पण बुद्धाचा उपयोग नाही असं  म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील वक्तव्याचा धागा पकडत भिडे यांनी हे विधान केलं. 
सांगली येथे  नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीमध्ये संभाजी भिडे सहभागी झाले होते.त्यावेळी ते बोलत होते.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करु शकतो. ते काम आपलं आहे. देशाने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध काहीच उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्याचा असेल तर छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत, असं देखील  संभाजी भिडे यांनी  म्हटलं आहे.
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे संभाजी भिडे यावक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुनही वाद होण्याची चिन्हं आहेत.

Leave a Reply

Back to top button