पाडळसे तालुका यावल परिसरातील अवैध धंदे बंद करा
फैजपुर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल
फैजपुर येथून जवळ असलेल्या पाडळसा तालुका यावल येथे सट्टा मटका जुगार गावठी दारू अवैध देशी विदेशी दारू सर्रासपणे काही महिन्या पासून बिनधास्तपणे सुरू असल्याचे चित्र आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पाडळसे तालुका यावल गावात अनेक वर्षापासून अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी ग्रामस्थांची मागणी असताना हे अवैध धंदे का बंद होत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे गुंड प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसत आहे पाडळसा तालुका यावल हे गाव आदर्श म्हणून ओळखले जाते या गावात अवैध धंदे बंद होण्यासाठी अनेक वेळा मोर्चे आंदोलन निवेदन देण्यात आले होते परंतु कोणतीही कायमस्वरूपी ठोस कारवाई होत नसल्याचे चिन्ह असून अवैध धंदे वाढतच चालले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता भासत आहे यामध्ये सर्रासपणे सट्टा मटका जुगार गावठी दारू अवैद्य देशी विदेशी दारू प्रत्येक गल्ली बोळात सर्रासपणे सुरू असल्यामुळे जनसामान्य ग्रामस्थांना याचा दररोज त्रास सहन करावा लागतो त्यामुळे अनेक प्रकार च्या तक्रारी सुद्धा होत असतात पाडळशातील हे वैद्य धंदे त्वरित बंद करण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी असून त्यामुळे होणाऱ्या तक्रारी आणि गुंड प्रवृत्तीला आळा बसेल अशी मागणी जोर धरू लागली आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे आणि ठोस पावले उचलून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे






