Amalner: Breaking: मुडी परीसरात बिबट्याचा धुमाकूळ… पहा व्हिडिओ..
अमळनेर मूडी बोदर्डे परीसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून आज सकाळी पहाटेच्या सुमारास गोऱ्यावर हल्ला करून त्यास ठार मारले आहे. या आधी देखील ह्या परिसरातील कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या बाबतीत वन विभागाने देखील परीसरात बिबट्या वावरत असल्याबाबत दुजोरा दिला आहे.अमळनेर तालुक्यातील बोर्डे शिवार येथे योगराज संदानशिव यांची गट नं. 35 हे शेती क्षेत्र आहे. आज दि. ०८/०८/2023 रोजी पहाटे सकाळी ४ वाजे दरम्यान सुमारे उ वर्षाचा गोरा (बैल) यावर हिंस्त्र प्राणी (बिबटया) ने हल्ला केला. त्यामुळे गोरा (बैल) मरण पावला आहे.सदर पशुधन हानीचा शासन नियमानुसार नुकसान भरपाई मिळावी तथा हिंस्त्र प्राणी (बिबटया) जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावे असे विनंती पत्र योगराज संदानशिव यांनी वनविभागाला दिले आहे.






