Amalner

?️ अमळनेर कट्टा … कोविड योद्धा उल्हास लांडगे यांना 50 लाख मदत शासनाकडून मंजूर

?️ अमळनेर कट्टा … कोविड योद्धा उल्हास लांडगे यांना 50 लाख मदत शासनाकडून मंजूर

अमळनेर : ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये जवखेडे तालुका अमळनेर जवळील चेक पोस्टवर 24 तास सेवा देण्याचे काम करणारे उल्हास लांडगे तरुण पोलीस पाटील यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले या घटनेची नागली हित दक्षता समिती अमळनेर गंभीर दखल घेतली समितीचे अध्यक्ष प्रा अशोक पवार, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत यांनी मा खासदार सुप्रिया ताई सुळे, आमदार अनिल भाईदास पाटील, श्रीमती सीमा अहिरे उपविभागीय अधिकारी अमळनेर, मा मिलिंद वाघ तहसीलदार अमळनेर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले व त्यात मृत पोलीस पाटील उल्हास दांडगे यांचे वारसास 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी केली सदर निवेदनावर श्री हिरामण कंखरे दिनेश भ लकार एसी तेले एके धनगर गजानन लक्ष्मण धनगर संदीप भिका मोरे हरिभाऊ मारवाड कर जयंतराव पाटील तुषार धनगर रमेश धनगर इत्यादींच्या सह्या होत्या
वरील मागणीची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख पालक मंत्री गुलाबराव पाटील आमदार अनिल भाईदास पाटील ग्रह सचिव जिल्हाधिकारी जळगाव यांनी सकारात्मक निर्णय घेऊन उल्हास लांडगे व जिल्ह्यातील तीन पोलीस पाटील यांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये मदत मंजूर करून त्यांच्या कुटुंबियांना जगण्याचे बळ दिले याबद्दल शासन व प्रशासनाचे नागरी हित दक्षता समिती अंमळनेर यांनी आभार मानले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button