Jalana

अंबड आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने योग दिन साजरा

अंबड आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने योग दिन साजरा

संजय कोल्हे जालना

अंबड : आज संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योगाचे महत्वपूर्ण योगदान आहे. हे भारताने संपूर्ण जगाला पटवून दिलं आहे. याच निमित्ताने आज आर्ट ऑफ लिविंग परिवार अंबड यांच्या वतीने जालना जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी ऑनलाइन योगा कार्यक्रम घेण्यात आला. ज्या मध्ये जिल्हा भरातून 1500 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला.
योगाने नागरिकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असं सांगत आर्ट ऑफ लिविंग चे समन्वयक फिरोज खान यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच, सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा आहे. योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळतं. आज संपूर्ण जग कोरोनाविरोधात (Covid-19) लढत आहे. अशा या कोरोनाच्या संकटात योग सर्वांसाठी आशेचा किरण ठरत आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी योग शिक्षक पांडुरंग शिंदे यांनी योगाचे प्रात्यक्षिके दाखवली तर कृष्णा बागल प्रकाश जाधव , वैभव खरात, मदन कदम यांनी प्राणायाम व ध्यान ऑनलाइन पद्धतीने घेतले.
पदमविभूषण श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रेरणेने आर्ट ऑफ लिविंग चे स्वयंसेवक अविरत पणे सेवा कार्यात पुढाकार घेत आहेत. समन्वयक प्रशिक्षक फिरोज खान यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व सतिश देशपांडे, रवी गात, प्रकाश नारायणकर, युवराज मापारी, संतोष देशमुख, संजय कोल्हे , सिद्धेश्वर उबाळे , दिपक लोहकरे, गोरख चोथे, सुभाष पवार, गणेश मिरकड सौ. योगिता टकले, सौ. स्मिता पवार, सौ. तारा तांबे , सौ. सुवर्णा शिंदे , सौ. अंजली उढाण यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button