Yawal

Yawal: कोरपावली येथे आजपासून हजरत पीरगैबन शाहवली यात्रोत्सवाला सुरुवात

कोरपावली येथे आजपासून हजरत पीरगैबन शाहवली यात्रोत्सवाला सुरुवात

यावल(प्रतिनिधी):- शब्बीर खान

तालुक्यातील कोरपावली येथील हिन्दु मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतिक म्हणुन ओळख असलेले हजरज पीरगैबनशाह वली यांच्या दोन दिवसीय उर्स निमित्ताने संदल व कव्वाली कार्यक्रमाचे आयोजनास आजपासून सुरूवात झालेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,मागील दोन वर्षांत कोरोना संसर्ग प्रार्दुभावामुळे शासनाने सर्वच सार्वजनीक कार्यक्रमांवर बंदी आणली होती.मात्र सध्या कोरोना नसल्याने जिल्ह्यात सार्वजानिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत.याचाच एक भाग म्हणून यावल तालुक्यातील कोरपावली येथे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला व हिन्दु मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतिक म्हणुन ओळख असलेले हजरज पीरगैबनशाह वली यांच्या दोन दिवसीय उर्स यात्रोत्सवाचे यंदा मोठया उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाकरीता परिसरातील तरूण वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.सालाबाद प्रमाणे कोरपावली गावातील मुख्य चौकातील हजरत पीर गैबंशह वली यांचा दर्गा असून या ठीकाणी यात्रा निमित्ताने सर्व जातीधर्माचे ग्रामस्थ पिरबाबांच्या यात्रेत एकत्रीत येऊन संदल शरीफ व कव्वाली कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात.यानिमित्ताने आज दि.११ जानेवारी बुधवार रोजी संदल शरीफ व दि.१२ जानेवारी रोजी ऊर्स निमीत्ताने हबीब अजमेरी,अजमेर, राजस्थान व परवीन तबस्सून टिव्ही सिगर,औरंगाबाद यांचा जंगी कव्वाली मुकाबला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी परिसरातील नागरिकांनी ऊर्स निमीत्त एकत्रीत येऊन संदल यात्रा व कव्वालीच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन हिंदू मुस्लीम पंच कमिटी कोरपावली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button