AusaMaharashtra

अखेर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पुढाकाराने मजूर स्वगृही परतले

अखेर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पुढाकाराने मजूर स्वगृही परतले
सचिव दीपक राठोड यांच्या पाठपुराव्याला आले यश

औसा प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:-

जगभरात सर्वत्र कोरोना या भयंकर विषाणूजन्य आजाराने थैमान घातले असल्याने सर्वत्र लॉकडाऊन पाळला जात आहे.

लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशभर व्यवसाय ठप्प झाले आहेत.अशातच औसा तालुक्यातील विविध तांड्यावरील जवळपास १२६ रोजंदारीकरिता गेलेले मजूर अनेक दिवसांपासून अडकून पडले होते.
गेल्या अनेक हे सर्व मजुर काम बंद असल्याने हालअपेष्टा सहन करत आपले जीवन जगत होते.

औसा तालुक्यातील सत्तरधरवाडी तांडा (२२), खानापूर तांडा (१२), लिंबाळा तांडा (३२), गाढवेवाडी तांडा (४८), तळणी तांडा (९), देवताळा तांडा (३) अशी एकूण १२६ कोथिंबीर व ऊसतोड कामगार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुका आणि कराड येथे अडकले होते त्यांना वेळोवेळी त्यांच्या राहते जागेवर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या व प्रशासनाच्या मदतीने राशन व जीवनावश्यक वस्तूंचा पाठपुरावा प्रदेश सचिव दीपक राठोड यांनी केला.
त्यांना स्वगृही परतण्यासाठी साठी प्रत्येकाला तिकिटाची रक्कम द्यावी लागेल असे आंबेगाव व जुन्नर तहसीलदार यांच्या वतीने सांगण्यात आले त्या नंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड दिपक राठोड यांनी महाराष्ट्र सरकारचे विमुक्त जाती आणि मदत व पुनर्वसन मंत्री मा.विजय वडेट्टीवार यांना लेखी पत्राद्वारे त्या मजुरांची मोफत वाहन व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली व त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र प्रदेश सचिव अमर खानापुरे यांच्या मार्फत केला.
ही मागणी मान्य करत राज्य शासनाच्या वतीने त्यांना मोफत वैद्यकीय तपासणी करून मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आले व ते आता प्रशासकीय नियम पाळून स्वगृही परतले आहेत.
या कामात आंबेगाव व जुन्नर तालुक्याचे तहसीलदार व त्या तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली.

हे मजूर दिनांक 10 व 11 मे रोजी अशा दोन टप्प्यात आपल्या स्वगृही परतले त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव दीपक राठोड यांनी त्या मजुरांची भेट घेतली त्यावेळी हे सर्व मजूर आलेल्या हालअपेष्टा कळवळून सांगत होते.आणि त्याचबरोबर घरी परतल्याचे समाधान ही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
त्यांच्याशी भेटून प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे अशा सूचना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव दिपक राठोड यांनी त्या मजुरांना दिल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button