Rawer

नगर भुमापन हद्दीतील वापराच्या मिळकतीच्या मालकी हक्काची दुहरी नोंद पध्दत चालु करुन बिगर शेतीगट , ७/१२ उतारा तलाठी दप्तरी चालु करण्या करीता जिल्हाधिकारी, व पालकमंत्र्यांना निवेदन सादर

नगर भुमापन हद्दीतील वापराच्या मिळकतीच्या मालकी हक्काची दुहरी नोंद पध्दत चालु करुन बिगर शेतीगट , ७/१२ उतारा तलाठी दप्तरी चालु करण्या करीता जिल्हाधिकारी, व पालकमंत्र्यांना निवेदन सादर

रावेर प्रतिनिधी -संदीप कोळी

रावेर तालुक्यातील १८ ते २० गावातील जिल्हाधिकारी यांचेकडील संदर्भीय पत्रान्वये नगरभूमापन हद्दीतील वापराच्या मिळकतीच्या मालकीहक्काची दुहेरी नोंद पध्दत बंद करुन त्याबाबतचा अहवाल सादर करणेबाबत तलाठी यांना सुचित करण्यात आले आहे. त्या नुसार या रावेर तालुक्यातील ठराविक बिगरशेती गटांचे उतारे तलाठी यांचेकडील देणे बंद झाले आहेत. या बिगरशेती प्लाँट गटाची सिटीसर्व्हेला नोंद नसल्यामुळे अडचणी भासत आहेत तरी सदरहु दुहेरी नोंद पध्दत चालु करुन बिगरशेती गट ७/१२ उतारा तलाठी दप्तरी चालु करुन सदरहु प्लाँट धारकांना योग्य तो न्याय देऊन उतारा मिळावा.
मौजे निंभोरा बु।। येथील ग्रामस्थांनी बिगरशेती गट ७/१२ उतारा तलाठी यांचेकडे दप्तरी नोंद चालु करण्या, बाबत जिल्हाधिकारी,तहसिलदार ,यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर ग्रा.पं.सदस्य युनुस खान शफीखान, शेख मुजाहीद शेख गुलाब, Adv.रमेश बळीराम चौधरी, राजेंद्र नारायण चौधरी, शे.गुलाब शे.अकबर, प्रकाश धोंडु चौधरी, सुरेश बळीराम चौधरी, मनोहर हिरामण नेमाडे, यांच्या सही निशी निवेदन देण्यात आले आहे.व जळगांव जिल्हा पालक मंत्री श्री.गुलाबराव पाटील यांनाही याबाबत निवेदन देऊन साकडे घालण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button