Amalner

अमळनेर बोरी पात्रात क्रिकेट प्रेमी,मद्य प्रेमी तसेच पत्ते प्रेमींचा जल्लोष

अमळनेर बोरी पात्रात क्रिकेट प्रेमी,मद्य प्रेमी तसेच पत्ते प्रेमींचा जल्लोष

प्रतिनिधी: योगेश पवार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोज मरे त्याला कोण रडे या उक्ती प्रमाणे संत सखाराम महाराज समाधी जवळ रोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत अक्षय तृतीया जवळ आली असल्याचा अनुभवयास मिळत आहे. अमळनेर पैलाड , किल्लाभाग व वाडी चौक परिसरातील बहुसंखेने नागरिक हे मनोरंजनासाठी बोरी पात्रात खेळायला येत असून येथील नागरिकांच्या मनात कोरोना व्हायरस बद्दल कोणतीही भीती वाटत नसल्याचे दिसून आले आहे. तथापि येथील रहिवाश्यांनी सुट्टीचा चांगलाच फायदा व आनंद होत असल्याचे दिसून येत आहे.बोरी नदी पात्रात पत्ते, क्रिकेट या खेळांबरोबरच मद्य प्रेमी चोरून लपून मद्य पीत आहेत. पोलीस प्रशासनाकडे संख्या बळ कमी आहे.त्यातच काही पोलीस कर्मचारी बाहेरगावी बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले आहेत.त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त शक्य नाही अशा वेळी नागरिकांनी प्रशासनाला मदत करणे आवश्यक आहे. परंतु अत्यन्त निष्काळजीपणा नागरिक दाखवीत आहेत.

देशात एकीकडे ७५० च्या वर कोरोना ग्रस्तांचा आकडा गेला आहे परंतु नागरिकांनी अजून पर्यंत कोरोना व्हायरस व संचार बंदीचे गांभीर्य लक्षात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारची पोलीस यंत्रणा नाही याच संधीचा फायदा घेत येथील नागरिक बोरी पत्रात विविध खेळाचा आनंद घेण्यास बहू संख्येने येतात. बाजारपेठेत पोलीस बंदोबस केला असता दुसऱ्या बाजूने नागरिक बेकायदेशीर रित्या संचारबंदी चा आनंद घेण्यासाठी रस्त्यावर येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button