कुठल्याही अटीशर्तीविना शेतकऱ्यांची मका खरेदी करावी खा.डॉ.भारती पवार यांची केंद्राकडे मागणी
सुनील घूमरे
केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार केवळ रब्बी हंगामाच्या उत्पादित मक्याची खरेदी करणार आहे .परंतु शेतकऱ्यांची खरीप हंगामातील मकाही अजून शिल्लक असल्याने रब्बी हंगामात उत्पादित झालेला मका व त्याच बरोबर खरीप हंगामात उत्पादित मका पण एकत्रित खरेदी करावा अशी मागणी दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे. ह्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचेशी खा.डॉ.भारती पवार यांनी फोनद्वारेही संपर्क केला असता त्यांनी शेतकऱ्यांची मका ही सरसकट खरेदी करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच याचे आदेश राज्य सरकारला दिले जातील .नासिक जिल्ह्यात मक्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते त्यामुळे ही मका विना अट खरेदी झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल व ह्या प्रादुर्भाव झालेल्या कोरोना विषाणू आपत्तीत शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीपासून दिलासा मिळेल.






