श्रीराम मंदिर करीता आपलें खाऊचे पैसे सावदा येथील २ लहान चिमुरडयांनी केले दान
युसूफ शाह सावदा
सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्य सावदा गावातील समर्थ व स्वरुप या २ चिमुरडयांनी मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र चे अयोध्या नगरीत उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिर साठी निधी संकलन साठी येणाऱ्या श्रीराम सेवाकांना थेट आपले खाऊ चे पैसे दान केले आहेत
अधिक माहिती अशी की अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर होऊ घातले आहे. त्यासाठी संपूर्ण भारतात निधी संकलनाचे काम श्रीराम सेवाकांनी हाती घेतले आहे त्यासाठी संपूर्ण भारतातील प्रत्येक जाती धर्मातील गरीब श्रीमंत लहान मोठे यांनी आपआपल्या परीने शक्य ती मदत करत आहेत. मंदिर उभारणीत आपला पण खारीचा वाटा प्रत्येक जण उचलायचा प्रयत्न करीत आहेत. यात सावद्यातील चिमुरडा समर्थ सचिन सकळकळे आणि स्वरूप सचिन सकळकळे या दोघ भावंडानी आपल्या खाऊचे पैसे मंदिर बांधणी साठी मदत म्हणून दान केले. याबद्दल या २ ही लहानग्या भावंडाचे कौतुक केले,तेवढे कमीच आहे
या प्रसंगी राकेश कासार, महेश अकोले गजानन भार्गव संदीप कासार, प्रदीप ,कुलकर्णी आदी उपस्थित होते.
तसेच इतरांनी सुद्धा या लहान मुलांच्या कौतुकास्पद कार्य पासून बोध घेतला पाहिजे आणि मंदिर साठी निधी संकलन करणाऱ्या श्री राम सेवकांकडे स्वतः पुढाकार घेऊन,जास्तीतजास्त देणग्या दिले पाहिजेत निवड हा संदेश इतरांना देण्याकरिता भगवान श्री रामचंद्र यांनी हा कार्य या लहान मुलांपासून घेतलेला असावा






