sawada

सावदा येथे विहीरीत उडी घेऊन एका प्रौढ व्यक्तीने केली आत्महत्या

सावदा येथे विहीरीत उडी घेऊन एका प्रौढ व्यक्तीने केली आत्महत्या

सावदा प्रतिनिधी/युसूफ शाह.

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे दिनांक १३ मे २०२३ रोजी दुपारी १२-२० वाजेच्या सुमारास शहरातील एका ५० वर्षीय प्रौढ व्यक्तीने शेतातील विहीरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,सावदा येथील सुरेश किटकुल लोखंडे ह्या व्यक्तीने शहरा लागत पनापीर दर्गा जवळील शेतकरी प्रमोद शंकर चौधरी यांच्या शेतातील उघड्या विहिरीत उडी घेऊन व पाण्यात बुडून आपले जीवन संपविले.ही खबर मिळताच पोलीसांनी पोहणाऱ्या इसम बोलावून त्यास विहीरीत उतरवले व विहीरीतून लोकांच्या मदतीने सदर प्रौढाचे प्रेत बाहेर काढले,विहीरीत पडल्याने त्याचे पायावर जखमा झालेल्या असून,
याबाबतची खबर हर्षवर्धन सुपडू कोचूरे.रा.सावदा ता.रावेर.यांनी सावदा पोलीस स्टेशनला स्वतः हजर राहून दिली,या विहिर खोल असून त्यातळ पाणी असल्याकारणाने सदरील व्यक्ती मृत्यूमुखी पडलेली होती.तरी या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात अ.मुशनं.१२/२०२३ सी.आर.पी.सी.चे कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आलेली असून,पुढील तपास एएसआय महेमुद शाह करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button