Shirpur

? Big Breaking…आदिवासी संघटनेमार्फत कलर्स टिव्ही वरील भारती सिंग यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व सायबर क्राईम अॅक्टनूसार गुन्हा दाखल करण्याची मागणी.

आदिवासी संघटनेमार्फत कलर्स टिव्ही वरील भारती सिंग यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व सायबर क्राईम अॅक्टनूसार गुन्हा दाखल करण्याची मागणी.

धुळे राहुल साळुंके

आज जय आदिवासी युवा शक्ति (JAYS), शिरपूर व आदिवासी टाइगर सेना(ATS) शिरपुर मार्फत भारती सिंग यांनी कलर्स टिव्ही वरील “खतरा खतरा खतरा” या रिपीट टेलीकास्ट च्या शोमध्ये संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून अश्लील कृती करत आदिवासी समाजाला जातीवाचक अश्लील अपशब्द वापरल्याने भारती सिंग व संपादक कलर्स टिव्ही यांच्या वर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व सायबर क्राईम अॅक्टनूसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावे म्हणून जय आदिवासी युवा शक्ति (JAYS) व आदिवासी टाइगर सेना (ATS) च्या वतीने सांगवी पोलीस स्टेशन येथे निषेध नोंदवत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहेत की श्रीम.भारती सिंग (मुळ पत्ता -अमृतसर, पंजाब ) यांनी “खतरा खतरा खतरा” या कलर्स टिव्ही वरील रिपीट टेलीकास्ट च्या शोमध्ये संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून “ये आदिवासी लोगही ऐसा कच्छा पहनते होंगे! ऐसावाला!” अश्लील कृती करत जातीवाचक अपशब्द वापरून हसत कृती केली आहे. प्रथमतः आम्ही आदिवासी समाजातर्फे याचा जाहीर निषेध करतो.

यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान होऊन आदिवासी समाजातील लोक दुखावले आहेत. भारती सिंग हिच्या या गैरकृत्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक व आईवाचक अश्लील शिविगाळ करणे, जातीवाचक अपशब्द बोलून आदिवासी समाजाच अपमान करणे, जातीवाचक बोलून समाजामध्ये तेड निर्माण करणे व आदिवासी विचारवंत, क्रान्तिकारकांच्या बाबतीत वाईट टिप्पणी करणे इत्यादी गैरप्रकार काही समाजकंटकांद्वारे जाणीवपूर्वक सुरूच आहे. अशा समाजकंटकांवर कायदेशीर कठोर कारवाई करून हा प्रकार कायमस्वरूपी थांबवला पाहिजे आणि आदिवासीं समाजाला अभिमानाने जगु द्यावे नाहीतर अशा समाजकंटकांविरोधात आदिवासी समाजातर्फे आंदोलनाद्वारे तीव्र रोष व्यक्त होईल यांची दखल प्रशासनाने घ्यावी म्हणून सर्व प्रथम श्रीम.भारती सिंग यांनी कलर्स टीव्ही च्या माध्यमातून आदिवासी समाजाची माफी मागावी. तसेच प्रशासनानी कलर्स टिव्ही वरील खतरा खतरा खतराच्या रिपीट टेलीकास्ट शो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा. श्रीम. भारती सिंग व संपादक कलर्स टिव्ही यांच्या वर अनुसूचित जाती व जमातीअत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व सायबर क्राईम अॅक्टनूसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची विनंती करत कार्यवाही न झाल्यास आन्दोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी जय आदिवासी युवा शक्ति (JAYS) व आदिवासी टाइगर सेना (ATS)चे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button