Maharashtra

ही बंदी नव्हे तर कोरोना पासून बचावाची संधी*

*ही बंदी नव्हे तर कोरोना पासून बचावाची संधी*

मनोज भोसले

देशावर करोना व्हायरसचं संकट आहे. हा आजार संसर्गजन्य आहे. संपूर्ण जग या महामारीमुळे संकटात आहे. अद्याप तरी भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे आपणच संसर्गापासून आपला बचाव करणं आणि इतरांचाही बचाव करणं हेच आपल्या हातात आहे.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी लोकांना रविवारी ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं आहे. रविवारी २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असेल. ही बंदी नव्हे ते कोरोनापासून बचावाची संधी आहे.

तसा हा आपणच आपल्यावर लादलेला कर्फ्यू आहे. हा जनता कर्फ्यू २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ९ पर्यंत लागू असणार आहे.

देशात करोना विषाणूचं संकट आहे. आतापर्यंत करोनावर कोणत्याही प्रकारचं औषध वा लस शोधण्यात आलेली नाही. या आजारापासून वाचवण्याचा एकच उपाय आहे. लोकांनी सोशल डिस्टंट ठेवायचं आहे म्हणजेच समाजात मिसळण्यापासून स्वत:ला वाचवायचं आहे.

आतापर्यंत या आजाराने भारतात रौद्र स्वरुप धारण केलेलं नाही. पण या टप्प्यावर सावधगिरी बाळगली तरच हा आजार नियंत्रणात राहू शकतो. असं केल्याने आपण स्वत:चा बचावही करू शकतो आणि इतरांचाही.

चाळीसगाव तालुक्यातील सबंधित विभागांचा आढावा घेतला असून ते आपली जबाबदारी निभावत आहेत,

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हात धुण्यासाठी व जनजागृतीसाठी चौकाचौकात स्टोल लावण्यात येणार असून १० हजार मास्क देखील पहिल्या टप्प्यात आपण वाटप करत आहोत.

आता आपण सुद्धा जबाबदारी ने स्वतच्या आरोग्याची काळजी घ्यावी, वारंवार हात धुवावेत,

चला तर संकटाच्या परिस्थितीत गट तट जात पात पक्षभेद विसरून, स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, समजासाठी, राज्यासाठी व देशासाठी आपण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवूया,

दि.२२ मार्च रविवार रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळूया… धन्यवाद, जय हिंद… जय महाराष्ट्र..!!!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button