?️अमळनेर कट्टा..ही कसली संचारबंदी आणि जमावबंदी….? बाजारात आज तुफान गर्दी..! एकाला अंगाशी..दुसऱ्याला पावतीशी..!अमळनेर शहरात लॉक डाऊन चा फज्जा..!
अमळनेर तालुक्यात च नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महाराष्ट्र शासनाने 5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत मिनी लॉक डाऊन ची घोषणा केली आहे. यात अत्यावश्यक सेवा फक्त सुरू राहतील.तसेच दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात अनेक सेवा बिनदिक्कतपणे सुरू आहेत.कुठेही पोलीस तैनात असलेले आढळून आले नाहीत.जिथे होते ते एका कोपऱ्यात उभे होते व कोणत्याही प्रकारच्या उपाय किंवा कार्यवाही करताना आढळून आले नाहीत.दुसरे म्हणजे लॉक डाऊन आणि दुकाने बंद करणे एव्हढंच आताच्या घडिला प्रशासनाला दिसत आहे. पण त्या व्यतिरिक्त कितीतरी नियमांचे उल्लंघन सर्रास पणे सुरू आहे.
एका गाडीवर 3 ते 4 व्यक्ती पोलिसांच्या समोरून जातात.त्यांनी मास्क लावलेला नसतो.
कितीतरी लोक अगदी प्रशासकीय कर्मचारी देखील रस्त्यावर बिनधास्तपणे थुंकतात..एकीकडे मास्क ची सक्ती करायची एखादा गरीब मजूर विना मास्क चा आढळल्यास त्याला 500 रु ची पावती फडायला तोच कर्मचारी सांगतो जो त्याच्या समोरच चार वेळा थुंकतो..
कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे बिनधास्त पणे गर्दी..कोणत्याही नियमांचं पालन नाही..आता पर्यंत दंड नाही..!
काही ठराविक दुकांनामध्ये नेहमीप्रमाणे गर्दी प्रशासनाचे ते जावई असल्याने त्यांना दंड नाही..
मेडिकल सेवा बिनदिक्कतपणे लोकांना लुबाडत आहे प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे..
दवाखान्यात हवे तसे लोकांना कोरोना च्या नावाखाली लुटलं जातंय प्रशासन त्यांना ह्या लुटारूंना कोरोना योद्धा म्हणतंय..
ह्या आणि अजून काही गोष्टींसह पुन्हा भेटू..






