Chandwad

चांदवड न प मुख्याधिकारी व स्वच्छता विभागाने कुंड्या व फुटलेल्या चेंबरचे काम मार्गी लावल्याने नागरिकांनी मानले आभार

चांदवड न प मुख्याधिकारी व स्वच्छता विभागाने कुंड्या व फुटलेल्या चेंबरचे काम मार्गी लावल्याने नागरिकांनी मानले आभार

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड शहरातील तळवाडे रोड भागात फुलेनगर येथील नागरिक वस्तीतील चेंबर रस्त्याचे काम सुरू असताना फुटलेले होते याबाबत नागरिकांनी मुख्यधिकारी श्री अभिजित कदम यांची भेट घेऊन समस्या मांडल्या.काल मुख्याधिकारी कदम साहेब, स्वच्छता अभियंता श्री सत्यवान गायकवाड साहेब यांनी तातडीने जे सी बी त्या ठिकाणी पाठवून काम मार्गी लावून दिले,त्याबद्दल प्रसाद प्रजापत,मनोज जाधव यांनी प्रशासनाचे आभार मानले.
तसेच महालक्ष्मी नगर भागातील कचराकुंडी स्वच्छ नसल्याबाबत सोशल मीडियातून अनेक तक्रारी येत होत्या त्याची दखल घेऊन कुंड्या स्वछ करून आणखी एक नवीन कुंडीची व्यवस्था महालक्ष्मी नगर भागात स्वच्छता विभागाने उपलब्ध केली त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button