चहाच्या टपरित चोरी..!चोरांनी चहाची टपरी पण सोडली नाही…चोऱ्यांचे सत्र सुरूच…
अमळनेर शहरात डॉ बाबासाहेब आबेडकर पुतळ्याच्या बाजूला सरकार टी (चहा) हॉटेल मध्ये चोरी झाली आहे. आसिफ शेख यांचे चहाचे दुकान सकाळी 07.00 वा.दररोज सुरु करून रात्री 08.00 वाजता शटरला कुलुप लावुन बंद करतात. काल दिनांक 02/8/2021 रोजी मी माझे चहाचे दुकान नेहमीप्रमाणे रात्री 08.00 वाजता बंद केले तेव्हा दुकानाच्या कान्टरच्या गल्यात 20000/- रुपये होते तेव्हा मी माझे दुकानाचे शटरला कुलुप लाऊन दुकान बंद करुन गेल्यानंतर 03/08/2021 रोजी सकाळी 07.00 वाजता मी नेहमीप्रमाणे चहाचे दुकान उघडुन आत प्रवेश केला असता माझ्या दुकानाचा मागील बाजूस असलेला पत्रा उचकवलेला दिसला व त्यानंतर दुकानातील साहीत्याची व कॉऊन्टर जवळ असलेल्या गल्याची पाहणी केली असता दुकानातील गल्ल्यात ठेवलेले 20,000/- रुपये मला आढळून आले नाहीत म्हणून खात्री झाल्यानंतर कुणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाचे मागील बाजूस असलेला पत्रा उचकावुन आत प्रवेश करुन गल्यातील पैशांची चोरी केली आहे. चोरीस गेलेल्या पैशांचे वर्णन खालील प्रमाणे – 20,000/- रुपये रोख चोरीला गेल्याची फिर्याद अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय दंड संहिता कलम 461,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुनील हटकर करत आहे.






