Maharashtra

भारिप बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ई व्हिएम मशिन मान्य नाही या संदर्भात दिले निवेदन

फैजपूर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्हाला मान्य नाही, ईव्हीएममध्ये घोळ करून भाजपाचा विजय झाला आहे. असा गंभीर आरोप करत ईव्हीएम विरोधात भारिप बहूजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारिप आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटाव , देश बचाव असा नारा देत येत्या विधानसभेत ईव्हीएम द्वारे मतदान न होता बॅलेट पेपर द्वारा मतदान व्हावे अशी मागणी फैजपूर भारिप बहुजन महासंघातर्फे प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

भारिप बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ई व्हिएम मशिन मान्य नाही या संदर्भात दिले निवेदन

निवेदनात म्हटले आहे की, मा.अॅड.बाळासाहेब आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष) वंचीत बहुजन आघाडी यांचे आदेशानुसार ई.व्ही.एम.मशिन बाबत सर्व सामान्य ग्रामीण भागातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये संशय असून त्याचे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका मध्ये काही मतदार संघात आलेल्या मतदानापेक्षा अधिक मते निघाली तर अनेक मतदार संघात कमी मतदान निघाले. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये लोकांचा लोकशाहीवर विश्वास असतांना ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून देशातही हूकमशाही येत असल्याच्या भावना लोकांना वाटत आहे. तरी निवडणूक आयोगाने यामध्ये पुढाकार घेऊन भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात. जेणेकरुन लोकांच्या मनामध्ये असलेला संशय दूरहोईल. अशी मागणी भारिप फैजपूर शहराध्यक्ष अमर मेढे यांनी प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून साळुंके यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते इमरान भाई, गोल्डन मेढे, अजय मेढे, सागर भालेराव, शुभम कोचुरे, अमोल तायडे व सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button