?️ अमळनेर कट्टा…दिव्यांगा ना योजनेचे लाभ द्या…राष्ट्रीय विकलांग पार्टीचे नगरपरिषदेला निवेदन..
शहरातील दिव्यांग व्यक्तींना कल्याणकारी योजनेचा लाभ मिळण्याची मागणी राष्ट्रीय विकलांग पार्टी तर्फे निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी प्रसंगी उपोषणाचा इशारा ही देण्यात आला आहे.
यावेळी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी निवेदनात नमूद केले आहे की, मागील वर्षी नपाने एसएडीएम कार्ड धारकांना निधी वाटप केला. त्यात यु आय डी कार्ड धारक नसल्याने निधी वाटप केला नाही. त्यामुळे मागील व ह्या वर्षीचा दिव्यांगाचा निधी सरसकट वाटप करण्यात यावा. अन्यथा दिव्यांग बांधव नगरपालिकेसमोर उपोषणास बसतील व त्यांच्या जीविताची हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे.






