Pune

भिमाई आश्रमशाळेवर युद्ध पातळीवर शिक्षक कर्मचाऱ्यांसह स्वयंपूर्तीने राबवली स्वच्छता मोहीम

भिमाई आश्रमशाळेवर युद्ध पातळीवर शिक्षक कर्मचाऱ्यांसह स्वयंपूर्तीने राबवली स्वच्छता मोहीम

राष्ट्रसंत गाडगेमहाराज आमचे आदर्श…. माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:- मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूरच्या सर्व विभागाच्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा संस्थाप्रमुख मा.रत्नाकर मखरे यांच्यासह श्रमदानातून आश्रमशाळेच्या परिसरातील स्वच्छता मोहीम यशस्वी पार पाडली.. “स्वच्छता” हा शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न होते.या स्वच्छतारुपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगायला शाळेत विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनीच २ ऑक्टोबर २० रोजी झाडू हातात घेऊन शालेय परिसर स्वच्छ केला. विद्यार्थ्यांच्या निवासी खोल्या धुऊन घेतल्या. स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, धान्यकोठी व वर्गखोल्या स्वच्छ व नीटनेटक्या करून घेतल्या. शाळा हा समाजाशी नाते जोडणारा घटक आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे आम्ही पाईक आहोत. ते स्वतः कधीही मंदिरात गेले नाही.तर मंदिराबाहेर राहणाऱ्या गोरगरीब जनतेची सेवा त्यांनी केली. गोरगरिबांची मुले शिकली पाहिजे. त्यांनी शाळेत जाऊन शिक्षण घेत असतानाच स्वच्छतेचा वसा घेऊन स्वतः सह शालेय परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे.असे गाडगे बाबा म्हणतं. गाडगेमहाराजांनी स्वतः गाव, वाडया,वस्त्यांची स्वच्छता करून एक आगळा वेगळा आदर्श जगाला घालून दिला. देशाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल करताना संत गाडगे बाबांची प्रेरणा घेऊन स्वच्छता मोहीम हाती घेऊन सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून यशस्वी केली. असे प्रसिध्दी पत्रकात मखरे यांनी म्हटले आहे. आश्रमशाळेच्या परिसराच्या यशस्वी स्वच्छता मोहिमेनंतर सर्व कर्मचाऱ्यांचे इंदापूरचे माजी नगराध्यक्ष तथा संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे यांनी कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button