Amalner: अरे भाऊ जुने भांडण.. चाकू नवा..!
अमळनेर (प्रतिनिधी) जुन्या भाडणाच्या कारणावरून दुकानात घुसून मारहाण करीत
गळ्याला चाकू लावून पैसे हिसकावून नेल्याची घटना शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये घडली. याप्रकरणी एकावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, ज्ञानेश्वर रतन साटोटे यांचे लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये फळ विक्रीचे दुकान आहे. दि.7 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास
मनोज उर्फ आर्यमान मंगल बिहाडे रा. राजारामनगर अमळनेर हा रिक्षा घेऊन दुकानात आला व शिवीगाळ करू लागला. तसेच तू माझ्या विरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार द्यायला का गेला होता, असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. कमरेला असलेला चाकू काढून गळ्याला लावत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फळ विक्रीचे जमा झालेले 1500 रुपये शर्टच्या वरच्या खिशातून काढून घेतल्याने त्याच्या विरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






