Maharashtra

गृप ग्रामपंचायत माळेगाव ता.पेठ ग्रामसभा सम्पन्न

गृप ग्रामपंचायत माळेगाव ता.पेठ ग्रामसभा संपन्न

गृप ग्रामपंचायत माळेगाव ता.पेठ ग्रामसभा सम्पन्न

ता.पेठ प्रतिनिधी विजय देशमुख
      आज दिनांक २७ /८/२०१९ वार-मंगळवार  गृप ग्रामपंचायत माळेगाव येथे ग्रामसभा घेण्यात आली.  सरपंच ईंदुबाई भरत चौधरी .अध्येक्ष स्थानी विठ्ठल देशमुख यांची निवड करण्यात आली .  अध्येक्ष निवडी बाबत धर्मराज देशमुख यांनी आभार मानले.   ग्रामसेवक संपावर असल्या कारणाने गायकवाड सर यांनी विषयांचे वाचन केले.  या सभेमध्ये विविध विषय घेऊन कृती आराखडा तयार करण्यातआले.
१)वृक्ष लागवड संगोपण कुप नं.    ८५,८६,८७.महामंडळ
२)दगडी व माती बांध घालने
३)गावांतर्गत मच्छर मारणी साठी फवारणी करणे
४)पाणी टंचाई ,पाणी योगेवापर कर.
५)वाढीव पोल ६)शेत तळे ७)कुकुट पालन
८)डुकरभजी ते महाविहिर रस्ता मागणी.
९)ग्रामपंचायत विभागणी ठराव.
१०)डुकरभुजी ते महारमाळा रस्ता मागणी.
११)नविन आरोग्ये उपकेंद्र मागणी.
 हे सर्व विषय घेतले पण ग्रामस्थांचे समाधान झाले नाहि कारण सरपंचानी मागील पेसा,चौदावित्त आयोग, ग्रामनिधी यातील कीती पैसा खर्च झाला कींवा कोंणती कामे केली याची माहिती ग्रामस्थांना दिली नाहि.
या साठी सर्व ग्रामस्थ आता या विषयी बी डीओ पेठ यांना ऐक निवेदन देऊन जाब विचारनार आहेेत .कारण ग्रामपंचायतीला ऐवढा निधी येत असून तो कुठे जातो. कोतांच विकास  नाहि. फक्त विनाकारण न झालेल्या कामांचे नावे द्यायची आणि पैसा खर्च करायचा. असा कारभार चालु आहेे. ग्रामस्थांची मागणी आहेे की,कामांचे ठराव केल्यापेक्षा ते काम प्रतेक्ष अमलात आनावेत.
अशा अनेक विषयांवर चर्चा करुन त्या कामांचे ठराव करण्यात आले.
 या ग्रामसभेला सरपंच,सदस्य,शिक्षक,ग्रामस्थ, यादव भोये, नामदेव राऊत,रमेश देशमुख
, अरुण देशमुख,पंढरीनाथ राऊत,कृष्णा चौधरी,अजीत देशमुख गोपीनाथ धुम,
आदि ग्रामस्थ उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button