Maharashtra

माळेगावात नारायण शिरगावकर यांच्या पथकाची मोठी कारवाई

माळेगावात नारायण शिरगावकर यांच्या पथकाची मोठी कारवाई

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे– बारामती तालुक्यातील माळेगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ लाख ७० हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३३ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून, बारामती तालुका पोलिस ठाणे हद्दीत रमाबाई नगर माळेगाव (तालुका बारामती )येथे रमण गायकवाड क्लब मालक व इतर हे एका बंगल्यात बेकायदा विना परवाना पत्त्यांचा क्लब चालवून पैशांवर जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती मिळून आली. सदर ठिकाणी छापा टाकला असता क्लब मालक गायकवाड यांच्यासह रोख रक्कम ,७ दुचाकी,१ चारचाकी गाडी, टेबल, खुर्च्या व जुगाराचे साहित्य ,असे एकूण ९ लाख ७० हजार ४० रुपयांचा मुद्देमाल व ३३ आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे .सदर आरोपी विरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातून पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी, सुरेश भोई, आप्पा दराडे ,वैभव साळवे,गणेश काटकर ,राहुल लाळगे,दत्तात्रय गवळी, तसेच आर.सी.पी पथक क्रमांक ३ मधील श्रीकांत गोसावी, रज्जाक मणेरी ,आबा जाधव, सचिन दरेकर ,अमोल चितकुटे ,सागर कोरडे, सुजित शिंदे , प्रियंका झणझणे,मंगल बनसोडे यांनी केलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button