India

आरोग्याचा मुलमंत्र…नखांची काळजी

आरोग्याचा मुलमंत्र…नखांची काळजी

सतत दलदल, पाणथळ भागात फिरणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. पोहण्याच्या तलावामध्ये दीर्घकाळ पोहणे, पाण्यात भिजलेले, दलदलीत वापरलेले बूट वारंवार वापरणे, अंगठ्याच्या नखाजवळ जखम होणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. बुरशीचा संसर्ग झाल्यावर तेथे पांढरे ठिपके दिसू लागतात मग ते पिवळे, हिरवे किंवा तपकिरी होऊ लागतात. नखं कधी अतिशय घट्ट तर काही वेळा पातळ होतात, ठिसूळ होतात, वरच्या किंवा आतल्या बाजूस गोलाकार वाढतात. नखाजवळ दुखू लागते. आपल्या नखांना बुरशीचा संसर्ग झाला आहे अशी शंका येताच किंवा नखांशी संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. नखांच्याबाबतीत डॉक्टरांची भेट लवकरात लवकर घेतली पाहिजे कारण वेळ गेल्यास त्रास वाढू शकतो. संसर्ग टाळण्यासाठी पाय नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.

यकृतच्या समस्या :
नखांचा रंग बदलणे हे सहसा यकृतच्या समस्येशी संबंधित असते. पण अशा समस्यांमध्ये नखे तुटत असल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. जर आपली नखे देखील स्वतःच तुटत असतील तर या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्या.

मज्जासंस्थेसंबंधी समस्या :
कधीकधी नखे तुटण्याची समस्या आपल्या पेशी आणि मज्जासंस्थेमध्ये बिघाड झाल्याचे देखील दर्शवते. वास्तविक, पेशी तयार करण्यासाठी आणि मज्जातंतू निरोगी ठेवण्यासाठी शरीराला ‘व्हिटामिन बी12’ची आवश्यकता असते. या व्हिटामिनच्या अभावामुळे नखे तुटण्याची समस्या देखील उद्भवते.

प्रथिने आणि कॅल्शियमची कमतरता :
प्रथिने आणि कॅल्शियमची कमतरता असल्यासही बर्‍याच वेळा नखे तुटण्याची समस्या उद्भवते. जर आपल्याला ही समस्या वेळेत समजली नाही तर हाडे, स्नायू आणि त्वचेशी संबंधित सर्व समस्यांचा धोका असतो.

या समस्येवर उपाय..
– प्रथिनेची कमतरता दूर होण्यासाठी मोड आलेली मूग डाळ व हरभरा खा.

– शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी डाळिंब, बीट, पालक, केळी, मेथी, अंजीर या घटकांचा आहारात समावेश करा.

– ‘व्हिटामिन बी12’साठी, डॉक्टरांच्या निर्देशानुसार डाएट अथवा सप्लीमेंट घ्या. त्याच वेळी कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आहारात दूध, दही, चीज या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

नखांवर तेलाने मालिश करा.
कोरडी पडल्यामुळे देखील बर्‍याच वेळा नखे मोडतात. अशा वेळी ऑलिव्ह किंवा एरंडेल तेलाने नखांचा नियमित मसाज करा. तसेच भरपूर पाणी प्या.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथी तज्ञ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button