नंदुरबार शहर मोठ्या आवाजाने दणाणले…मोठ्या प्रमाणात नुकसान
फहिम शेख
नंदुरबारमध्ये काल झालेल्या मोठ्या आवाजाबाबत विमान पडल्याच्या अफवांचे फोन येत असल्याने पडताळणी केली.
एटीसी मुंबई व हिंदुस्थान एरोनॉटिकल नाशिक येथून माहिती घेतली सुपरसॉनिक बुम फायटर जेट सुखोई विमान पुणे येथून पुणे नाशिक व नाशिक एचएएलच्या अंडर च्या फ्लाइंग एरिया मध्ये प्रॅक्टिससाठी होते. नंदुरबार हा भाग नाशिक HALचे फ्लाईंग एरीयामध्ये येतो. सदर विमान सुखरूप परत पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे विमान कमी उंचीवरुन उडत असल्यास सुपरसानिक बुम या सराव प्रकारात अशा प्रकारे प्रचंड मोठा आवाज होतो अशीही माहिती त्यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक किशोर नवले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबार यांनी दिली आहे.






