राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका या महिला कर्मचाऱ्यांना भाऊ बीज भेटीची रक्कम वाढवावी..
प्रतिनिधी : महेंद्र साळुंके
अमळनेर : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका या महिला कर्मचाऱ्यांना सन २०१७ पासून दरवर्षी दोन हजार रुपये भाऊबीजभेट (बोनस) दिली जाते.यासाठी शासनाकडून दरवर्षी सुमारे ४० कोटी रुपयांची तरतूद केली जाते.परंतु सदरची तरतूद अत्यल्प आहे. म्हणून शासनाने भाऊबीज भेटीसाठी लागणारी तरतूद वाढवून सदर रक्कम वाढवावी.राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर भाऊबीज भेट द्यावी. अशी मागणी करणारे अनेक निवेदने शासनाला संघटनेने पाठवली आहेत. परंतु शासनाने आजतागायत भाऊबीजभेटीबाबत निर्णय घेतला नाही. कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी कोरोनासंबंधीत सर्व कामे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतही महत्त्वाचे योगदान देत आहेत.तरीही शासन निर्णय घेत नाही म्हणून अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.या बाबींचा विचार करून शासनाने या शंभर टक्के महिला कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भाऊबीजभेटीची रक्कम देऊन त्यांची नाराजी दुर करावी.अशी मागणी दोन्ही संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केली आहे.
कोरोना काळात जीव धोक्यात घालून योगदान देणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना दिवाळीपूर्वी भाऊबीजभेट द्यावी – रामकृष्ण बी.पाटील यांची मागणी






