यावल येथे शासकीय भरडधान्य खरेदी केंद्रचा 30 मे रोजी शुभारंभ
यावल येथे उद्या दि. ३० मे रोजी रब्बी हंगामातील शासकीय मका व ज्वारी भरडधान्यखरेदी केंद्राचा शुभारंभ होत आहे.
प्रतिनिधी सलीम पिंजारी
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या भगिरथ प्रयत्नातून आणि तालुक्याच्या आमदार सौ. लताताई सोनवणे, आमदार रावेर चे आमदार शिरीषदादा चौधरी, माजी खासदार हरीभाऊ जावळे यांच्या पाठपुराव्यानुसार यावल तालुका खरेदी विक्री संघ येथे उद्या दि. ३० रोजी सकाळी ११.३० वाजता शुभारंभ होत आहे. त्यावेळी वरील सर्व मान्यवरांसह बाजार समिती सभापती तुषार पाटील, उपसभापती श्री. उमेश प्रभाकर पाटील, तालुक्याचे तहसीलदार जितेंद्र कुँवर यांच्यासह बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या वतीने सबएजंट म्हणून कोरपावली वि. का. सोसायटी कामकाज करणार असून त्याचा लाभ तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन कोरपावली वि. का. सो. चे चेअरमन, बाजार समिती संचालक राकेश फेगडे यांनी केले आहे.






